
लातूर दि २३ ऑक्टोबर ग्रामपंचायतीच्या ८अ वर उभा राहिलेले ओम हामणे पॅराडाईज हे महाराष्ट्रातील महत्वकांक्षी प्रकल्प आहे लातूर च्या वैभवात भर पाडणारे हे प्रकल्प स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या परिसरातील सहवासात निर्माण करण्याची ईच्छा हामणे परिवाराने व्यक्त केली हि कौतुकाची बाब असल्याचे माजी मंञी आमदार श्री अमित देशमुख यांनी ओम हमणे पॅराडाईज या मंगल कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. ते पुढे म्हणाले कि हि वास्तु अगदी माहेश्मती साम्राज्यात आल्याची भास देत आहे. हि वास्तु राजकीय मेळाव्याला न देण्याचा सल्लाही त्यांनी हामणे यांना दिला. २०१९ ते २४ सालात ३ सरकार स्थापन झाले आता चौथे सरकार स्थापन होण्याची शक्यताही व्यक्त केली.
लातूरातील नव्यानेच तयार होत असलेले माजी महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे यांचे बंधु विशाल मंगल कार्यालयासाठी या ओम हामणे पॅराडाईज ची संकल्पना येथुन सोबत नेण्याची सूचनाही केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबासाहेब पाटील हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंञी आमदार श्री अमित देशमुख, परमपुज्य श्री श्री श्री १००८ डाॅ मल्लिकार्जुन विश्वनाथ शिवाचार्य महाराज, डाॅ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, रेणुक शिवाचार्य महाराज, निरंजन शिवाचार्य महाराज, मा महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे, श्री दिपक सुळ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री श्रिशैल्य उटगे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे संचलन बसवंत भरडे व शिककांत स्वामी प्रस्तावना ॲड गंगाधर हामणे तर आभार अमोल हामणे यांनी व्यक्त केला आहे.
