संजय राऊतांना जामिन मंजूर लातूरात शिवसेनेचा आनंदोत्सव.
लातूर दि ०९ नोव्हेंबर सत्तांतराच्या नाटकी घडामोडी आणि सुड उगवण्यासाठी सिबीआय आणि ईडी च्या धाडी चा अंक कधी संपणार अशी भावना मनी बाळगलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आज एक उच्च न्यायालयाकडुन दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा सत्याचा विजय होत आहे असे मत आज लातूर येथे आनंदोत्सव साजरा करताना लातूर शिवसेनाप्रमुख श्री शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले आहे. फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटून हा आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी उपजिल्हा प्रमुख विष्णु साबदे , महानगरप्रमुख विष्णू साठे,शहर प्रमुख रमेश माळी साहेब ,व्यापारी आघाडीचे मार्गदर्शक सी के मुरळीकर जिल्हा उपप्रमुख एस.आर चव्हाण चव्हाण, तालुकाप्रमुख बाबुराव शेळके, कामगार सेना जिल्हा संघटक तानाजी करपुरे, लातूर शहर समन्वयक युवराज वंजारे, भास्कर माने बाळू दंडिमे, राहुल रोडे, एडवोकेट चव्हाण, सुनील मोदी , शिवराज मुळगावकर, राजू कतारे, रोहित दोपारे, माधव कलमुकले, शंकर गंगणे, साधू मोरे, सोमनाथ स्वामी, राज लाटे, यांच्यासह सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
