वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘युवा जोडो” व शाखा नियोजन बैठक संपन्न.
लातूर दि १० नोव्हेंबर नुकत्याच घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका व आगामी इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने ‘युवा जोडो” व शाखा नियोजन बैठकीतीचे आयोजन सुरु आहे त्या निमीत्ताने लातूर शहराच्या वतिने डाॅ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथा घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करुन वंचित बहुजन आघाडीला बळ वाढविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न व्हावा हा उद्देश बैठकीत ठेवण्यात आला होता. हि बैठक लातूर शहर युवा अध्यक्ष श्री महेंद्र बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती तर युवा उपाध्यक्ष आकाश नवगिरे यांनी प्रस्ताव व रोहित सोनवणे यांनी अनुमोदन केले आहे. यास सर्व मंडळाने अनुमती देऊन पुढील वाटचालीस सुरुवात केली आहे. असे एका प्रसिद्धी पञकात युवा अध्यक्ष श्री बनसोडे यांनी म्हटले आहे.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी लातूर शहर आकाश भोसले, कृष्णा सोमवंशी, गौरव हनवते, गणेश फावडे, नागसेन ननवरे, पंकज कांबळे, प्रथमेश कांबळे, संस्कार हाळे, पंकज दांडे, गणेश सोनवणे, यशवंत सूर्यवंशी, प्रसाद पाटील, विनीत पोरे, करण शंके, शाहनवाज शेख, वैभव कांबळे, योगेश गायकवाड, स्वप्नील कांबळे, ऋषिकेश कांबळे, अजिंक्य बनसोडे, निखिल कांबळे, शक्ती लवटे, नितेश शिंदे आदी उपस्थित होते.