नवनिर्वाचित भाजपा सरपंचांचा सत्कार.नवनिर्वाचित भाजपा सरपंचांचा सत्कार.

नवनिर्वाचित भाजपा सरपंचांचा सत्कार.

लातूर ग्रामीण मध्ये प्रस्तापितांची सत्ता उलथून भाजपा कार्यकर्त्यांनी यश मिळविले-आ. रमेशअप्पा कराड

लातूर ग्रामीण मतदार संघातील मुरुड सह अनेक गावातील प्रस्थापितांची सत्ता उलथून सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांनी यश मिळवले. नवनिर्वाचित सरपंचांनी मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून गावच्या सर्वांगीण विकासाची कामे करावीत आणि मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले आहे.

नवनिर्वाचित भाजपा सरपंचांचा सत्कार.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील लातूर, रेणापूर तालुक्यासह भादा सर्कलमधील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केलेल्या नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच लातूर तालुका – पिंपळगाव अंबा –भैरवनाथ आनंदराव पिसाळ, कोळपा- सिद्धेश्वर श्रीगिरे, सलगरा खु.- सौ. श्रीदेवी सोमनाथ कांबळे, सामनगाव- सौ.प्रिती ईश्‍वर बुलबुले, कारसा- मुरलीधर शहाजी साळूंके, अंकोली- समाधान लक्ष्‍मण आडगळे, सावरगाव- अ‍ॅड. धनराज राजेसाहेब शिंदे, रेणापूर तालुका – जवळगा- सौ.संगिता सुर्यकांत बनसोडे, सेलु खु- सौ. अर्चना नामदेव बोंबडे, हारवाडी- सौ. यशोदा कातपुरे, यशवंतवाडी- ओम चव्‍हाण, माणुसमारवाडी- सौ. निताबाई पंडीत शिंदे, कोष्‍टगाव- सुंदर धोंडीबा घुले, गोढाळा- सौ. मिना त्र्यंबक भताने, धवेली- सौ. अंजना लिंबराज मेकले, घनसरगाव- सौ. महानंदा शरद दरेकर, चाडगाव- सौ. मंदा लक्ष्‍मण कांबळे, टाकळगाव- सौ. कुशाबाई आश्रुबा चोरमले, लखमापूर- सौ. संध्‍या रमेश खाडप, मोटेगाव- धनंजय साहेबराव पवार, भोकरंबा- राजु हाके, वांगदरी- विजय शहाजी गंभिरे, डिघोळ देशमुख– अजिंक्य अनिल कदम, आरजखेडा- कुलदिप सुर्यवंशी, इटी/नागापूर – इंदुबाई कल्याण जगदाळे, दर्जीबोरगाव- रमेश शेषेराव कटके, शेरा- बेबीसरोजा बालासाहेब भुरे, इंदरठाणा- अविनाश सतिष रणदिवे, औसा तालुका – वानवडा- सौ. मंगलबाई फुलचंद अंधारे, जायफळ- सौ. नंदाबाई दिलीप भोंग, वडजी – महादेव शंकर गुरुशेट्टे, बिरवली – अनिता अर्जुन चव्हाण, उटी बु.- मणिषा लक्ष्मण कांबळे, शिवली – लिंबाबाई सुधाकर खडके, वरवडा- प्रभावती रामभाऊ शिंदे, कवठा केज- गिरीधर पवार यांच्यासह अनेक सरपंचचा भाजपाच्या संवाद कार्यालयात फेटा बांधून पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित भाजपा सरपंचांचा सत्कार.

आज केवळ नवनिर्वाचित सरपंचांचा सत्‍कार होत असून जानेवरीच्‍या पहिल्‍या आठवड्यात कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यात सरपंचासह नवनिर्वाचित सदस्‍यांचाही भव्‍य दिव्‍य सत्‍कार सोहळा करण्‍यात येईल असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात आपण काम करतोय त्यांनी गेल्या ८-९ वर्षात गोरगरीब सामान्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयामूळेच गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेनी भाजपा पॅनलला भरभरुन आशिर्वाद दिले आणि वर्षानूवर्षे प्रस्तापितांची अनेक गावात असलेली सत्ता भाजपाच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी उध्वस्त केली. नवनिर्वाचित सरपंचांनी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जिद्दीने, प्रामाणिकपणे आणि निस्वार्थी काम करुन जनतेनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहावे आणि मिळालेल्या संधीचे सोनं करुन दाखवावे. कामे करा जनता कदापीही विसरत नाही.

नवनिर्वाचित भाजपा सरपंचांचा सत्कार.

गेल्या विधानसभा निवडणूकीत मतदार संघ विकत घेण्याचे पाप झाले. ज्यांनी हे पाप केले त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांची जागा दाखवून मुंबईचे आलेले पार्सल परत मुंबईला पाठवू असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की या मतदार संघात ऊस उत्पादक शेरकर्‍यांसह सर्वसामान्यांची होणारी आडवणूक आणि पिळवणूक यापूढे कदापी सहन करणार नाही. लोकशाहीत हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा असा इशारा देवून राज्य शासनाने सरपंच, नगराध्यक्ष जनतेतून निवडीचा ऐतिहासीक निर्णय घेतला त्याचप्रमाणे बाजार समितीच्या निवडणूकीत शेतकर्‍यांना उभा राहण्‍याचा महत्वपूर्ण घेतलेल्या निर्णयाला स्थानिक देशमुख आमदारांनी विरोध केला हे शेतकरी हिताचे नव्हे तर शेतकरी विरोधी असल्याचे बोलून दाखविले.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केलेल्‍या नवनिर्वाचित सरपंचांचा शनिवारी सत्‍कार आयोजित केला असता प्रस्‍तापित कॉग्रेसच्‍या पिलावळांनी मध्‍यमवर्गीय आणि आरक्षणातून विजय संपादन केलेल्‍या सरपंचांना या कार्यक्रमास जाऊ नये यासाठी दबाव टाकण्‍याचा प्रयत्‍न झाला, कार्यक्षेत्रातील सर्वच कारखान्‍याची यंत्रणा वापरली तरीही कसल्‍याही दबावाला बळी न पडता मतदार संघातील नवनिर्वाचित ७६ सरपंचापैकी तब्‍बल ४५ सरपंचांनी भाजपाचा सत्‍कार स्विकारला असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, दबाव टाकल्‍याचे फोन रेकॉर्ड आमच्‍याकडे आहेत, खबरदार दबावाचे राजकारण कराल तर खपवून घेणार नाही वेळ प्रसंगी जशास तसे उत्‍तर दिल्‍याशिवाय राहणार नाही असा सज्‍जड इशारा दिला.

यावेळी नुतन सरपंच सौ. महानंदा शरद दरेकर, भैरवनाथ पिसाळ, मुरलीधर साळूंके, अ‍ॅड. धनराज शिंदे, अविनाश रणदिवे, सौ.संध्या रमेश खाडप आणि सुंदर घुले यांनी आपले मनोगत व्यक्त करुन येत्या काळात गामस्थांच्या आपेक्षा पूर्ण करु गावच्या सर्वांगीन विकासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.

नवनिर्वाचित भाजपा सरपंचांचा सत्कार.

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, साहेबराव मुळे, डॉ. बाबासाहेब घुले, वसंत करमुडे, सतिश आंबेकर, गोविंद नरहरे, चंद्रसेन लोंढे, ललीता कांबळे, महेंद्र गोडभरले, अनंत चव्हाण, राजकारण साठे, शाम वाघमारे, सुधाकर गवळी, श्रीकृष्ण पवार, शरद दरेकर, गोपाळ शेंडगे, प्रताप पाटील, गोपाळ पाटील, अशोक सावंत, पद्माकर चिंचोलकर, संजय डोंगरे, शेख जलील, राज जाधव, श्रीमंत नागरगोजे, बापूराव बिडवे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!