
लातूर दि १४ ऑक्टोबर लातूर शहरातील बाभळगाव रोडवरील म्हाडा कॉलनी भागात रस्ते व नाली व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत असल्याची तक्रार त्या भागातील काही महिलांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे दूरध्वनीच्या माध्यमातून केली होती, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड किरण जाधव यांना सदरील भागात जाऊन पाहणी करण्यास व नागरिकांच्या अडीअडचणी ऐकून घेण्यास सूचना केली.

ॲड किरण जाधव यांनी शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी म्हाडा कॉलनी चौक येथील नागरिकांची भेट घेतली त्यांचे म्हणणे ऐकून घेतले,अडीअडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेच्या सहकार्याने घरासमोर थांबलेले पाणी काढले, मुरूम टाकून नागरिकांना तात्पुरता रस्ता करून दिला,आपले म्हणणे तातडीने ऐकून घेऊन समस्या दूर केल्याबद्दल म्हाडा कॉलनीतील नागरिकांनी आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत.