
लोहारा दि १४ ऑक्टोबर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कास्ती बु येथे प्राणिमित्र व सर्पमित्र श्रीनिवास माळी यांनी विद्यार्थ्यांना साप शेतकऱ्याचा मित्र व साप व त्याविषयीचे समज , गैरसमज , अंधश्रद्धा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले निमित्त होते. दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळी मुलांना शाळेच्या संरक्षक भिंतीमध्ये साप दिसला विद्यार्थ्यांनी शिक्षकांना अवगत केले शिक्षकांनी प्राणी मित्र श्रीनिवास माळी यांना फोन करून संपर्क केला ते तात्काळ शाळेत उपस्थित झाले त्यांनी ‘डुरक्या घोणस’ जातीचा साप पकडला व त्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांना उत्तरे दिली .तसेच कास्ती गावातील व परिसरातील लोकांच्या मनात असणारी मंदिरात घेऊन जाण्याविषयी असणारी श्रद्धा व वास्तव याबाबतीत जागृत केले. कोणत्याही सापाचा दंश झाला असता तात्काळ सरकारी दवाखान्यात घेऊन जावे .दंश झाल्यानंतरचा एक तास रुग्णांसाठी ‘गोल्डन अवर ,’असतो याविषयी माहिती दिली. तसेच तात्काळ करावयाचा प्रथमोपचार याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते नावेद खानापुरे उपस्थित होते.
यावेळी लोहरा गटशिक्षण कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी श्री भास्कर बेशकराव साहेब , श्री सुभाष चव्हाण साहेब केंद्रप्रमुख श्री गजानन मक्तेदार सर साधने व्यक्ती अनंत लहाने सर केंद्रीय मुख्याध्यापक श्री चंदनशिवे सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.