MPSCMpsc

लातूर, दि ३० ऑक्टोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थांनी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!