
पुणे प्रतिनिधी : दि २९ ऑक्टोबर तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेची काल दि २८ रोजी मतदार यादी जाहीर झाली असुन दि १४ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील तायक्वांदो खेळातील अनेक राज्य संघटना अधिकृततेचा दावा करीत होत्या पण काल जाहीर झालेल्या निवडणुक कार्यक्रमात तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण साळुंके, सचिव मिलींद पठारे व कोषाध्यक्ष विनायक गायकवाड कुमठा स्ट्रीट बालार्ड ईस्टेट मुंबई या राज्य संघटनेबाबत अधिकृत मतदार म्हणून काल शिक्का मोर्तब झाला.
अखेर वाद संपुष्टात येवून राज्य संघटना निश्चित झाली आहे. दि १४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीनंतर राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेची दिशा ठरेल. अशी माहीती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव श्री मिलींद पठारे यांनी एका प्रसिद्धी पञकाद्वारे दिली आहे.