
लातूर प्रतिनिधी : लातूर तालुक्यातील अंकुली येथे स्वर्गीय रावसाहेब मुळे यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तर कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन लातूर ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार श्री वैजनाथ दादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन अंकुली गावातील ग्रामस्थ व पोलीस अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून करण्यात आले असुन दोन दिवसीय चालणाऱ्या या स्पर्धेसाठी संपुर्ण जिल्ह्यातील कुस्ती खेळाडुंनी विविध वयोगटातील वजनी गटात आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मागील ४० वर्षात कुस्ती खेळाच्या माध्यमातून विविध क्षेञात उच्च पदावरील न्यायधिश, अधिकारी, डाॅक्टर, व्यापारी, उत्कृष्ट शेतकरी गावाचे नाव उंचावणाऱ्या सर्व खेळाडुंच्या सत्काराबरोबरच विशेष सत्कार एकाच घरातील दोन डाॅक्टर झालेल्या कु पल्लवी दामोदर मुळे व कु राहुल दामोदर मुळे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. गावात रावसाहेब मुळे असताना ते गावचे सरपंच ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सदस्य पदापर्यंत ची त्यांची मजल होती. ते हुषार चाणाक्ष परखड व स्पष्ट व्यक्तिमत्त्वाचे होते. अंकुली गावात सन १९८२ साली पहिली स्पर्धा स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली होती त्यानंतर हि स्पर्धा आज रावसाहेब मुळे यांच्या स्मरणार्थ तब्बल ४० वर्षानंतर पार पडत आहे असे मत स्पर्धेचे उद्घाटक माजी आमदार श्री वैजनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. हि स्पर्धा दोन दिवस चालणार असुन सर्व स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची सोय केली असल्याचे पोलीस विभागात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी श्री दामोदर मुळे यानी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ रेखा महेंद्र मुळे, शबीर पैलवान, लातूर कुस्तीगीर परिषद सरचिटणीस श्री अशोक भोसले, श्री नागनाथ देशमुख, श्री गोरख जाधव, श्री बालाजी पाटील, श्री दिनकर गवळी, श्री सचिन शिंदे, श्री पंडितराव अडसुळे, श्री विठ्ल पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डाॅक्टर ओमप्रकाश जाधव यांनी केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री उमाकांत मुळे व अशोक भोसले यांनी आपला मनोगत व्यक्त केले तर सुञसंचलन प्रा सचिन सुर्यवंशी यांनी व आभार उमाकांत रावसाहेब मुळे यांनी व्यक्त केले.
