नोकरभरती

लातूर दि ०४ नोव्हेंबर जिमाका जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवरील सैनिक मुलांचे व मुलींचे वसतिगृह व विश्रामगृह येथे विविध अशासकीय रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याकरिता माजी सैनिक, आजी सैनिक पत्नी, विधवा तसेच इतर नागरिकांनी 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात सादर करावेत.

चौकीदाराच्या तीन पदांसाठी भरती होणार असून यामध्ये दोन पुरुष व एक महिला चौकीदाराची प्रतिमाह 8 हजार 911 रुपये मानधनावर नियुक्ती करण्यात येईल. सफाई कामगारांच्या दोन पदांवर एक महिला व एक पुरुषाची प्रतिमाह 5 हजार 658 रुपये मानधनावर नियुक्ती होईल. माळी पदावर एका व्यक्तीची प्रतिमाह 4 हजार मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!