ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता अंमलदाराचा सत्कार..
लातूर दि ०५ नोव्हेंबर ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्र पोलीस दलास सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या लातूरच्या पोलीस अंमलदार पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे सलमान नबीजी यांचा नुतन पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. सप्टेंबर दम्यान नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ७ वी ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धेत ज्युदो क्लस्टर क्रीडा प्रकारात लातूर जिल्हा पोलीस दलातील खेळाडू सलमान नबीजी याने सुवर्णपदक जिंकले होते. हे पदक ५० किलो खालील वजनी प्राप्त झाले असुन सलमान नबीजी यांनी यापूर्वी पंजाब येथे झालेल्या पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये ब्रांझपदक जिंकले होते.

सलमान नबीजी हे राष्ट्रीय पातळीवरील ज्यूदो क्लस्टर स्पर्धेत पिंचाक सिलात या खेळात महाराष्ट्र पोलिस दलात पहिले सुवर्णपदक जिंकून देणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे असे माहिती एका प्रसिद्धी पञकात दिली आहे.
या पदक प्राप्ती बद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक श्री. अनुराग जैन, यांनी सलमान नबीजी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राखीव पोलीस उपनिरीक्षक दिगंबर माने, क्रीडा प्रशिक्षक रामलिंग शिंदे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.