राज्य उत्पादन शुल्कराज्य उत्पादन शुल्क

धाब्यावर दारु पिताय थांबा ! राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाब्यावर धडक कारवाई.

लातूर ता. निलंगा दि ११ नोव्हेंबर राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री. प्रदीप पवार साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्हयाचे अधीक्षक श्री. केशव गो. राऊत, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८/९/२०२२ रोजी मे. हॉटेल आराध्या, निलंगा, ता. निलंगा, जि. लातूर येथे नोंदविलेल्या अवैध मद्याचा गुन्हा नोंदविण्यात आला त्यामध्ये एकूण १० इसमांना अटक करण्यात आली. सदर गुन्हयामध्ये रु. ३९९५/- (रु. ३९९५/-) रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी मद्यपीं तसेच धाबा मालक यांच्यावर कारवाई करुन ताब्यात घेण्यात आले महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ अन्वये हॉटेल व मद्यपींवर कारवाई करण्यात आली. अटक आरोपींना दि. ९/११/२०२२ रोजी मे. न्यायालय, निलंगा येथे हजर केले असता ढाबा मालक यांना रु. २५०००/- व इतर मद्यपींना रु. १०००/- प्रत्येकी दंडा आकारण्यात आला असा एकूण रु.३४,०००/- दंड आकारण्यात आला.

सदरच्या कारवाईमध्ये अधीक्षक , लातूर – श्री. केशव राऊत, निरीक्षक-उदगीर विभाग श्री. आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक श्री. स्वप्नील काळे, श्री. अ. ब. जाधव, श्री. एल. बी. माटेकर, श्री. ए. के. शिंदे, व सहाय्यक दुय्यम निरीक्षक- श्री. गणेश गोले, श्री. ए. एल. कारभारी, जवान – श्री. अनिरुद्ध देशपांडे, श्री. हनमंत मुंडे, श्री. संतोष केंद्रे, श्री. सुरेश काळे, श्री. श्रीकांत साळुंके, श्री. ज्योतीराम पवार यांनी सहभाग नोंदविला.

अवैध मद्यविक्री तसेच मद्यपी व अवैध हॉटेल/धाबा विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे श्री. केशव राऊत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!