राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारवाईचा धडाका; लाखोंची अवैध्य दारु जप्त.
लातूर दि ११ नोव्हेंबर राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाचे विभागीय उप-आयुक्त प्रदीप पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक केशव राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० नोव्हेंबर सायंकाळी च्या सुमारास बाभळगाव रोड ने गाडी वलांडीला जात असल्याची माहिती महाराष्ट्र युवा शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमर शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर परवते यांनी दिलेल्या माहिती वरून रात्री आठ च्या दरम्यान अवैध मद्याची गाडी पकडून लाखोंची दारु जप्त करण्यात आली. त्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आले आहे.

प्राप्त माहिती नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला दि. १० नोव्हेंबर रात्री आठ च्या दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने दिलेल्या माहिती वरून अवैध दारु विक्री करण्याच्या उद्देशाने MH03AH5508 या क्रमांकाच्या गाडी मध्ये किंगफिशर,आर सी कंपनीची दारुचे तब्बल २५ ते ३० बाॅक्स घेवून जात असताना पथकाने रंगेहाथ पकडून मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आले. सदर गुन्ह़यामध्ये एक चारचाकी वाहनासह लाखोंचा अवैध मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच या विभागाने लातूर जिल्हातील मद्यपीं तसेच धाबा मालक यांच्यावर रात्री उशीरा पर्यंत कार्यवाई.
या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक आर. एम. चाटे, एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, स्वप्नील काळे, अ. ब. जाधव व सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. एल. कारभारी, गणेश गोले, जवान अनिरुध्द़ देशपांडे, हनमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्योतीराम पवार यांनी सहभाग नोंदविला.
अवैध मद्यविक्री तसेच मद्यपीं व अवैध हॉटेल / धाबा विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नांव गुप्त ठेवले जाईल असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क केेेशव राऊत लातूर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.