उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीसांचे फोटो लागले पोलीस अधीक्षक कार्यालयात.
लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा स्तुत्य उपक्रम

लातूर दि १३ नोव्हेंबर पोलीस प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे मनोबल व कार्यक्षमता वाढविण्यासाठी लातूरचे पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केली आहे. दर महिन्याला जिल्हात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र व बक्षीसपञ देऊन सन्मानासोबतच त्यांच्या कार्याचा कार्य अहवाल त्यांच्या फोटोसहित पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात उत्कृष्ट तपास स्था गु शा डिवायएसपी गजानन भातलवंडे, शैलेश जाधव, गवारे, कोतवाड, स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, भाऊसाहेब खंदारे, रामचंद्र ढगे, 112 नंबर अति तात्काळ येणारे काॅल ला प्रतिसाद दिपक कुमार वाघमारे, मिलींद बानाटे, कज्जेवाड, सिसिटीएन डाटा फिडींग गांधी चौक पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, सुजाता कस्पटे, अवैध धंद्यावर कारवाई कामठेवाड, प्रतिबंधित कारवाई बालाजी मोहिते, समन्स बजावणी शैलेश बंकवाड, सुनिल फड, सुनिल श्रिरामे, गुन्हे निर्गती गणेश सोंडारे, वारंट बजावणी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, जि एम गुंटे, कौतुकास्पद कामगिरी बद्दल राष्ट्रीय खेळाडु सलमान नबीजी, दिपक कुमार वाघमारे, तुळशीराम वडने यांचा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांचे फोटो पोलीस अधीक्षक कार्यालयात लावले आहेत.

पोलीस अधीक्षक श्री मुंडे यांच्या या नव्यानेच सुरू केलेल्या स्तुत्य उपक्रमाने पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नक्कीच मनोबल वाढुन त्यांची कार्यक्षमता वाढीस लागेल हे निश्चित असले तरी हे उपक्रम किती काळ चालु राहील हा येणारा काळच सांगेल पण हे उपक्रम सातत्याने चालु राहिल्यास सर्वाधिक वेळा उत्कृष्ट कार्य करणारे स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री सुधाकर बावकर या धाडसी आणि जिवाचे रान करुन तपासाच्या मागे पळणाऱ्या निडर अधिकाऱ्याचे नाव असेल हे निश्चितच.
