बीड जिल्हा शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडूंचा सत्कार
बीड – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बीड जिल्हा शालेय तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “खेळाडूंनी कौशल्य विकसित करून खेळातील गुणवत्ता वृद्धिंगत करावी, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव साळुंके यांनी यावेळी केले. या वेळी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडूंचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला.
येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बहुउद्देशीय हॉल मध्ये दिनांक ११ व १२ नोव्हेंबर २०२२ दरम्यान दोन दिवस जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, बहुउद्देशीय हॉल, बीड येथे पार पडली .

जिल्हाभरातील जवळपास २०० हून अधिक खेळाडूंनी दोन दिवस स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखविले. जिल्हा बीड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव साळुंके यांच्या हस्ते व शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख व जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव डॉ.अविनाश बारगजे, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य डाके एस ए व जयश्री बारगजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार साहेब यांनी ही स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. बीड जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू अविनाश पांचाळ, आंतरराष्ट्रीय पदक विजेती खेळाडू कु. नयन बारगजे, राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू अमित मोरे, पारस गुरखुदे, देवेंद्र जोशी, सुरज देशमुख यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून सत्कार करण्यात आला.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वासुदेव साळुंके, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी , जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख व बीड जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव डॉ अविनाश बारगजे यांनी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन केले. बन्शी राऊत ( केज), प्रसाद साहू (अंबाजोगाई), राष्ट्रीय पंच अनीस शेख, कृष्णा उगलमुगले, अमित मोरे, सचिन कातांगळे , पारस गुरखुदे, सुरज देशमुख, आदित्य भंडारे , देवेंद्र जोशी, अमन तांगडे (बीड) , नितीन आंधळे, बाळासाहेब आंधळे, (वडवणी), कु.अमृता गायकवाड ( केज) यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी देशमुख, कार्यकारी अधिकारी चांदवडकर, विक्रम सारुक साहेब व राजपूत साहेब यांनीही स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख मॅडम, तालुका क्रीडा अधिकारी पी.एस.चव्हाण व तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या खेळाडूंची आगामी औरंगाबाद विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सर्व मुख्याध्यापक व प्राचार्य यांना आवाहन !!
शालेय क्रीडा स्पर्धांसाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,प्राचार्य यांनी शाळेतील क्रीडा शिक्षक अथवा या क्रीडा क्षेत्राशी संबंधित माहिती असलेले सहशिक्षक यांच्या मदतीने आपल्या शाळेतील खेळाडूंचे प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे स्पर्धेच्या अगोदर तीन दिवस नोंदणी शुल्क भरून प्रवेशिका जमा करावी व कुठल्याही खेळाडूचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवासिनी देशमुख यांनी जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे.
