महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री पठारे राष्ट्रीय संघटनेत सहसचिव.
लातूर दि १४ नोव्हेंबर आज नवीन दिल्ली येथे सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेची निवडणूक प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत महाराष्ट्राचे तायक्वांदो राज्य सचिव श्री मिलींद पठारे हे राष्ट्रीय संघटनेच्या सहसचिव पदासाठी आपले फाॅर्म भरले होते. यामधे ते ३७ मतांच्या फरकाने यशस्वी झाले आहेत. त्यांच्या या विजयाचा महाराष्ट्रात आनंदोत्सव केला जात आहे. श्री पठारे हे राज्य संघटनेवर महासचिव आहेत. मधला काळात राष्ट्रीय फेडेरेशन अंतर्गत कलहामुळे विखरले गेले होते ते पुन्हा एकञ येऊन आज झालेल्या निवडणुकीनंतर पुन्हा सुरळीत होईल अशी आशा आहे.
या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी श्री इशारी गणेश सचिव पदासाठी आर डी मंगेशकर, कोषाध्यक्ष पदासाठी जसबीर सिंग गिल यांचा विजय झाला आहे. नुतन कार्यकारणी खेळाडुंच्या हिताचे आणि विस्कळीत झालेल्या सर्व खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करेल अशी आशा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. या नुतन कार्यकारणी व फेडेरेशन चे सचिव श्री मिलींद पठारे यांचे लातूर तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील व सचिव नेताजी जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
