क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवेक्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे

जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी.

लातूर दि १५ नोव्हेंबर आद्यक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या २२८ व्या जयंतीनिमित्त काल दि १४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्ह्यातील दर्जी बोरगाव येथे लोकनायक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महादुभाऊ रसाळ व बंटी गायकवाड यांच्या वतिने शालेय साहित्याचे वाटप, संत गोरोबा सोसायटी चेअरमन विकास कांबळे यांच्या वतिने फळे वाटप, आर्यन सेनेचे अविनाश निंबाळकर यांच्या वतिने रक्तदान शिबीर, अण्णाभाऊ साठे पुतळाजवळ अंध गायकांचा शाहिरिचा कार्यक्रम शहरातील विविध ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी.

१७ नोव्हेंबर १८१७ साली इंग्रजा विरुद्ध लढताना लहुजींचे वडिल राघोजी साळवे यांना लहुजींच्या समोरच विरमरण आले तेंव्हा “मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी” असा मनी ध्यास घेणारे वस्ताद लहुजी साळवे यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. लहुजी दांडपट्टा फिरविणे, घोड्यावर स्वारी, भालाफेक, बंदूक चालविणे, तोफगोळे फेकणे, गमिनी काव्याने शत्रूला मात देणे, शत्रूंची गुप्त माहिती मिळविणे आदी युद्धकलांत तरबेज व पारंगत होते. त्यांच्या तालमीतून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर, सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे यांच्यासारखे अनेक क्रांतीवीर देशाला दिले. अश्या क्रांतिवीराला विनम्र अभिवादन.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!