पत्नीशी मिञाचा संबंध असल्याचा संशयावरून मिञालाच भोसकून ठार.
दोन दिवसानंतर पोलीस ठाण्यात येऊन स्वतःच दिली कबुली.
लातूर दि २३ मिञानेच आपल्या पत्नीशी जवळीक साधणाऱ्या मिञाला भोसकून ठार केले असुन मृतदेह ब्लँकेट मधे दगडासोबत गुंडाळून मांजरा नदी पाञात पाण्यात सोडल्याचा धक्कादायक प्रकार स्वामी विवेकानंद पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडला असुन त्यावर पोलिसांनी त्याच्याच जबाबावरुन भा.द.वि ६४४/२०२२ कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला.
सविस्तर वृत्त असे समजते कि लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे ब्रम्हवाडी येथील सुग्रीव अप्पाराव कांबळे (वय ३२) व चाकूर तालुक्यातीलच मौजे आटोळा येथील राम कुमदळे हे दोघे मित्र होते. दोघांनी मिळून काही दिवसांपूर्वी आयशर टेम्पो खरेदी केला होता. तो टेम्पो हे दोघे भाड्याने चालवत होते. एकमेकांच्या घरी येणे- जाणे असल्याने राम कुमदळे याचे सुग्रीवच्या बायकोशी जवळीक निर्माण झाली होती. त्यातून दोघांचे अनैतिक संबंध वाढले. राम हा सतत सुग्रीवच्या बायकोला फोनवर बोलत असल्यामुळे सुग्रीवचा संशय अधिक वाढला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी टेम्पोच्या भाड्याचे पैसे का खर्च केले म्हणून रामने सुग्रीवच्या घरी जाउन त्याच्या आईला व बायकोला शिवीगाळ केली होती. हे दोन्ही राग सुग्रीवला सतावत होता. त्यामुळे सुग्रीवने शुक्रवारच्या ( दि.१८ ) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान रामला गोड बोलून त्या आयशर टेम्पोत बसवले आणि लातूर शहरातील रिंगरोडवरील गोजमगुंडे यांच्या मळ्याजवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला. सोबत आणलेल्या चाकुने रामच्या पोटात, तोंडावर गंभीर वार करुन त्याचा टेम्पोमध्ये खून केला. त्यानंतर रामचा मृतदेह एका ब्लॅंकेटमध्ये दगडासह गुंडाळून मौजे चामेवाडी नजिक मांजरा नदीच्या पुलावरुन नदीपात्रात फेकला. या भयानक घटनेची कोणालाच कसलीही खबर नव्हती. पण घटनेला २ दिवस उलटल्यानंतर रविवारी रात्री आरोपी सुग्रीव कांबळे हा स्वतः शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात आला आणि रामचा खून करुन, मृतदेह नदीत फेकल्याची कबुली दिली असल्यामुळे मयत रामचा मृतदेह फेकलेल्या ठिकाणाला शहराचे पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे, विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुधाकर बावकर, सपोनि भाऊसाहेब खंदारे यांनी भेट दिली. सुग्रीवच्या पत्नीचा जवाब अजून पोलीस दफ्तरी नोंद झाला नसून, मयत रामचा मृतदेही अद्याप पोलिसांना सापडला नाही. सर्व पातळीवर शोध सुरु असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी सांगितले.
