किर्ती भराडिया ने केला नवा विश्वविक्रम; ७ तास ३० मिनीटात ३८ किमी पोहत प्रवास
मुंबई प्रतिनीधी : सोलापूर च्या अगदी १६ वर्षाच्या किर्ती भराडिया बनवला नवीन विश्वविक्रम काल दि २४ नोव्हेंबर रोजी कु किर्ती नंदकिशोर भराडियाने अरबी समुद्रात वरली सि लिंक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचा ३८ किलोमीटर प्रवास तिने पोहत फक्त ७ तास ३० मिनीटात पुर्ण केला आहे. तिने वरली सि लिंक वरुन ११ वाजुन ५२ मिनीटाने सुरुवात करून ७ वाजुन ३० मिनीटाने गेट वे ऑफ इंडिया ला पोहंचली आहे. तिच्या या विक्रमाची नोंद घेण्यासाठी जागतिक विक्रमाची नोंदी घेणारे अधिकारी पुर्णवेळ समुद्रात बोटीमधे उपस्थित होते.

किर्ती ने सन २०१९ साली बनवलेला स्वतःचाच विक्रम तोडला असुन ति या आधी ११ ऑगस्ट २०१९ ला १२:१५ तासात ३४.५ किलोमीटर इतका पोहण्याचा विक्रम केला होता. तिच्या या विक्रामबद्दल श्री मनमोहन डागा यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस लातूर नेता न्युज चॅनेलच्या माध्यमातून शुभेच्छाही दिल्या आहेत.
