प्रभाग क्रमांक ३ चे अध्यक्ष विकास कांबळे यांनी दिला सांडपाण्याला मार्ग.
लातूर दि ०९ डिसेंबर प्रभाग क्रमांक ०३ येथील रहीम नगर भागात सांड पाणी वाहुन जाण्यासाठी नालीच नसल्यामुळे परिसरात पाणी जमा होऊन दुर्गंधी येत होती. हि बाब प्रभाग ०३ चे अध्यक्ष श्री विकास कांबळे यांच्या श्री सुभान रोटे यांनी लक्षात आणुन दिली असता श्री कांबळे यांनी तप्तरता दाखवत जेसीबी मागवून तात्पुरता नाला तयार करुन दिला आहे. हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी श्री कांबळे यांनी केलेली धडपड लक्षात घेऊन येथील नागरिकांनी त्यांचा सत्कारही केला आहे.
श्री विकास कांबळे हे अत्यंत धाडसी असुन कार्यतत्पर सामाजिक भान असणारा काँग्रेस कार्यकर्ते म्हणुन ओळख आहे. पक्षाने त्यांच्यावर दिलेली सर्व कामे जबाबदारीपुर्वक ते करत असुन ते कृतीशील आहेत. त्यांना प्रभागातील लोकांनी समस्या मांडल्या आणि ते त्याला बघु अस कधिच उत्तर देत नाहीत. त्या समस्या तात्काळ मार्गी लावत असताना दिसत आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरीक आनंदी असल्याचे चिञ दिसत आहे.