३२ व्या राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन.
पुणे दि. १३ डिसेंबर तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या वतिने पुणे जिल्ह्यात आयोजित केलेल्या ३१ व्या राज्य वरिष्ठ गटातील तायक्वांदो स्पर्धेचे आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस अधिकारी श्री शैलेश गायकवाड यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री अविनाश बारगजे हे होते तर तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव श्री मिलींद पठारे ताम चे कोषाध्यक्ष श्री विनायक गायकवाड, दोन वेळा शिवछञपती पुरस्कर्ते श्री प्रविण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच श्री दुलिचंद मेश्राम, राज्य तायक्वांदो पदाधिकारी श्री व्यंकटेश कर्रा, विजय कांबळे, बालाजी जोगदंड हे यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिवछञपती पुरस्कर्ते श्री लाला भिल्लारे, प्रविण संकुल व खेळाडुंचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दुलीचंद मेश्राम यांनी मांडत असताना तायक्वांदो खेळातील सध्य स्थितीतील राजकारण आणि खेळाडुंची दिशा यासोबतच स्पर्धेचे महत्व आणि फायदे याची ओळख करुन दिली तर प्रमुख पाहुणे श्री शैलेश गायकवाड यांनी तायक्वांदो खेळ उच्च दर्जाचा असुन खेळाडुंनी सर्वाधिक फायदा घेत स्पर्धा परीक्षेतील यश संपादन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत असलेले तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया चे सहसचिव श्री मिलींद पठारे यांनी खेळाडुंनी दिशाहीन न होता स्वच्छ आणि सत्य पदाधिकाऱ्यांसोबत जोडुन रहा सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बाबी पसरवल्या जात आहेत अश्या गोष्टी व अफवांवर विश्वास ठेऊ नये त्या पुढे पाठवू नये असे मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी श्री अविनाश बारगजे यांनी खेळाडुंना शुभेच्छा देत या स्पर्धेतील विजयी खेळाडुंचा राष्ट्रीय स्पर्धेचा सर्वस्वी खर्च राज्य संघटना करेल असे घोषित केले आहे.
कार्यक्रमाचे सुञसंचलन श्री नेताजी जाधव यांनी तर आभार श्री व्यंकटेश कर्रा यांनी केले. यावेळी २५ जिल्ह्यातील ३०० हुन अधिक सहभागी खेळाडु उपस्थित होते.
