टि एफ आय चे नुतन सहसचिव श्री मिलींद पठारे यांचा लातूर तायक्वांदोच्या वतिने सत्कार.
लातूर दि १३ नुकत्याच झालेल्या तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या निवडणुकीतून सर्वाधिक मताने विजयी होत सहसचिव पदावर आपला शिक्का मोर्तब करणारे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव श्री मिलींद पठारे यांचा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल बालेवाडी येथे सुरु असलेल्या ३२ व्या राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेत लातूर तायक्वांदो संघटनेच्या वतिने अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील व सचिव श्री नेताजी जाधव यांच्या वतिने सत्कार करण्यात आला.
यावेळी आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस अधिकारी श्री शैलेश गायकवाड, शिव छञपती पुरस्कर्ते प्रविण बोरसे, तामचे कार्यकारी अध्यक्ष श्री अविनाश बारगजे, कोषाध्यक्ष श्री विनायक गायकवाड, आंतरराष्ट्रीय पंच दुलिचंद मेश्राम, राज्य पदाधिकारी श्री व्यंकटेश कर्रा व मोठ्या संख्येवर खेळाडु, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक उपस्थित होते.
