बाभळगाव येथील बशीर शेख यांचा घात; हात पाय डोके धडावेगळे; अवयव कुञे खात होते.
लातूर दि १५ डिसेंबर बाभळगाव येथील बशीर मदार शेख यांच्या घात झाला असल्याचे नातेवाईकांचा संशय असुन घटनास्थळावर शरिराचे तुकडे सापडले आहे तर धड अद्याप सापडले नसुन दोन्ही हात कुञे शिवारात नेवून खात असताना शेजारील शेतकऱ्यांना दिसले असता ग्रामीण पोलीसांना सदरील घटनेची माहिती कळवताच ते घटनास्थळावर दाखल झाले. दोन्ही पाय व डोके बाभळगाव वरुन बोरी ला जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात पडलेल्या अवस्थेत होते तर एक हात रस्त्यावरून जवळच असलेल्या त्यांच्याच शेतात कुञे खात असताना दिसले आहे. हि घटनास्थळावर पोलीस इतर अवयवांची शोधाशोध घात असताना दुसऱ्या हात रस्ताच्या दुसर्या बाजुला एक कुञा घेवून पळत असताना शेजारील लोकांना दिसला आहे. माञ धड अद्याप सापडले नसुन त्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व श्वान पथकाला पाचारण केले आहे.

दरम्यान बशीर शेख यांच्या पत्नी व मुलीच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम 302 व 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बशीर मदार शेख हे विविध सहकारी सोसायटी सदस्य असुन त्यांचे वय 71 आहे. त्यांना तिन मुले व पाच मुली आणि पत्नी असा परिवार असुन अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाचे ते होते. त्यांचे घटनास्थळाजवळच शेत असुन ते लाकडांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे.

ते रविवार 11 डिसेंबर रोजी नांदेड येथील मुलीकडून येउन सोमवारी राञीची लाईट असल्यामुळे राञी 09 वाजता शेतात पाणी देत होते. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यांची पत्नी शेतात त्यांच्या जेवनाचा डबा घेऊन गेले असता शेतात बुट मोटारसायकल होती माञ ते दिसत नव्हते त्यांनी परिसरात चर्चा केली पण ते भेटले नाहीत. ते न सांगता नातेवाईकांकडे असतील असे समजून पत्नीने अधिक चौकशी केली नाही. माञ आज त्यांचा हात कुञे घेऊन जात असताना शेजारील शेतकऱ्यांना दिसल्याचे समजते त्यांनी पोलीसांना तात्काळ कळवले व ग्रामीण पोलीस उपअधीक्षक तसेच लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम घटनास्थळावर पोहंचले. कांही काळ धड न सापडल्याने घटनास्थळावर नातेवाईकांकडून इतर अवयव नेण्यासाठी अडवून केली माञ पोलीस व गावकऱ्यांच्या मध्यस्थीने समजूत काढून धडाशिवाय इतर अवयव शव विच्छेदनासाठी पाठवले आहेत.

पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीसांकडून सुरु असून परिसरात प्रचंड हळहळ होत आहे.