मनपाच्या पाणि कर्मचाऱ्याच्या खेडसाळपणा विकास कांबळेनी सरळ केला.
लातूर दि १६ डिसेंबर नगर विकास कामातून लातूर महानगरपालिकेने शहरातील प्रभाग क्रमांक ३ येथील करिम नगर भागात काही मोजक्याच ठिकाणी नळाच्या पाण्याची पाईपलाईन टाकली माञ इतर दोन गल्लीत ती टाकलीच नाही. हि बाब नागरिकांनी प्रभाग क्रमांक ३ चे काँग्रेस अध्यक्ष श्री विकास कांबळे यांच्या लक्षात आणून दिली. श्री कांबळे यांनी तात्काळ माजी मंञी आमदार श्री अमित देशमुख व काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कर्मचाऱ्यांची चौकशी केली पण यांचा यात खोडसाळपणा दिसुन आला श्री कांबळे यांनी तो खोडसाळपणा मोडून काढत तात्काळ इतर दोन गल्लीत पाईपलाईन चे काम सुरू करण्यास भाग पाडले. तेंव्हा नागरिकांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते.
यावेळी बालाजी केदासे, सय्यद इलियास, सुभान रकटे, सादिक भाई, शेख रुकसाना भाभी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.