राष्ट्र साधनेसाठी योग साधना अत्यंत महत्त्वाची प्रवचनकार माधवीताई जोशी
लातूर/ प्रतिनिधी : राष्ट्र चेतना शिबीराचे पहिले पुष्प गुंफताना राष्ट्र साधनेसाठी योग साधना अत्यंत महत्त्वाची असल्याचे योगी अरविंदांच्या लक्षात आले आणि त्यावर त्यांनी व्यापक कामही केले असे मत योगी अरविंद यांच्या जन्म शताब्दी निमित्त प्रवचनकार माधवीताई जोशी यांनी मांडले. दि १९ डिसेंबर रोजी श्री केशवराज शैक्षणिक संकुलात भारत भारती, विद्याभारती, क्रीडा भारती, विज्ञान भारती, (ERA)Educational Research assembly, Heartfulness आणि शिक्षण विवेक व भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने रेनिसन्स सीबीएसई संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती वर्षाताई मुंडे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई प्रमुख अतिथी म्हणून मा. श्रीमती नीता अग्रवाल प्रसिद्ध उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

प्रवचनकार माधवीताई आपल्या प्रवचनात त्या पुढे मांडणी करताना योगी अरविंद यांचा जन्म १८७२ मध्ये झाला व त्यांचा मृत्यू १९५० मध्ये झाला. त्यांनी ७८ वर्षांच्या जिवनात महायोगी म्हणून आपली ओळख निर्माण केली. डॉक्टर कृष्णघन घोष व स्वर्णलता देवी यांचे तिसरे अपत्य म्हणजे श्री अरविंद म्हणजे कमळ. पाण्यात राहून अलिप्त असा याचा अर्थ अरविंद यांना ग्रीक, जर्मन, फ्रेंच अशा सर्व भाषांचे ज्ञान होते. त्यांची वृत्ती गंभीर अशी होती पण ते प्रचंड ज्ञानाचा स्त्रोत होते. त्यांनी आयसीएस ची परीक्षा प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी केली. ब्रिटिशांची आयसीएस परीक्षेसाठी अनिवार्य असलेली घोडेस्वारीची परीक्षा नाकारली व भारतात आल्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारी सनदी अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली. त्याचबरोबर त्यांनी बडोद्याच्या कॉलेजमध्ये इंग्रजी व फ्रेंच भाषेचे अध्यापनही केले. सयाजीराव गायकवाड यांनी अरविंद घोष यांना कोहीनूर हिरा म्हणून संबोधले. या काळात भारतीय तरुणां शी त्यांचा संपर्क आल्यामुळे राष्ट्रभक्तीचे बीज रोवले गेले. बडोदा हे गुजरात मध्ये असल्यामुळे त्यांनी, गुजराती, बंगाली आणि सर्व भारतीय भाषा शिक्षण घेऊन अध्यापनाचे कार्य केले . यादरम्यान त्यांनी भवानी भारत हे काव्य लिहिले त्यांच्या लेखणीवर टिळकांच्या जहाल मतवादी विचारांचा प्रभाव होता. त्याचा विचार समजून घेण्यासाठी त्यांनी मराठी भाषा अवगत केली. ते क्रांतिकारी विचारांचे होते म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना अलीपूरच्या तुरुंगात एक वर्ष तीन दिवस तुरुंगात डांबले ते तुरुंगवास भोगून बाहेर पडताना योगी बनले व राष्ट्र साधनेसाठी योग साधना हाच सर्वोत्तम उपाय आहे हे विष्णू भास्कर लेले गुरूंच्या तीन दिवसीय योग दिक्षेतून त्यांच्या लक्षात आले. स्वामी विवेकानंदांनी शिकागो या धर्म परिषदेत भारताची सहिष्णुता किती उपजत आहे हे जगाला पटवून दिले . त्यांच्या भाषणातून बंधू नो आणि भगिनींनो या शब्दावर प्रचंड तीन मिनिटं टाळ्यां पडल्या. भारतीय संस्कृती आणि इतिहास वैशिष्ट्यपूर्ण आहे हे जगाला दाखवून दिले. सत्याने असत्यावर ज्ञानाने अज्ञानावर सुष्टांनी दुष्टावर मात करायला शिकले पाहिजे. हे या व्याख्यानमालेतून माधवी ताई जोशी यांनी सांगितले. एकंदरीत निष्काम कर्म करणे ही योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारातील साम्य त्यांनी आपल्या व्याख्यानातून प्रतिपादित करत होत्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री नितीन शेटे शिबिर संयोजक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजश्री कुलकर्णी यांनी केले. कांचन तोडकर यांच्या कल्याणमंत्र्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला लातूरकरांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला होता.
यावेळी श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी हेंडगे, रेनिसन्स सीबीएसई स्कुलचे अध्यक्ष मा .डॉ. श्री. मनोज शिरुरे, प्रधानाचार्या अलिशा अग्रवाल, शिशूवाटिका प्रमुख सौ.मंजूताई जोशी, श्रीमती योगिनीताई खरे, उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षक संदीप देशमुख, दिलीप चव्हाण, बबन गायकवाड, अंजली निर्मळे, शिबीर प्रमुख गुरुनाथ झुंजारे, शिबीर महाव्यवस्थापक जितेंद्र जोशी यांनी केले आहे.