जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेत विश्व तायक्वांदो अकॅदमीचे घवघवीत यश.
लातूर दि १९ डिसेंबर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने आयोजित लातूर जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेत विश्व तायक्वांदो अकादमीने घवघवीत यश संपादन केले असुन ३४ सुवर्ण २० रजत तर ४२ कास्य पदकांची कमाई केली आहे. या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडल्या असुन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमास तालुका क्रीडा अधिकारी श्री सुरेंद्र कराड, तायक्वांदो जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील तायक्वांदो आशियाई प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच तथा जिल्हा सचिव श्री नेताजी जाधव उपस्थित होते. या स्पर्धा १४,१७ व १९ वर्ष वयोगटात संपन्न झाल्या असुन दि २६ व २७ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणाऱ्या विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी या खेळाडुंची निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेची तांञीक बाजु श्री नेताजी जाधव यांनी तर पंच म्हणून कु श्रुती कुलकर्णी, धनश्री मदने, श्रद्धा कुलकर्णी, श्रेया मदने, आसावरी कुलकर्णी, अदिती मेनकर, जान्हवी मदने व प्रेरणा सोरडे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी कु अनुश्री कुलकर्णी कु गितांजली नागरगोजे कु रागिनी क्षिरसागर कु सोहम मेनकर व कु रुद्राक्ष रुमणे यांचे सहकार्य लाभले.
