विभागीय कराटे स्पर्धेत किनवटच्या शोतोकान कराटेपट्टू यशस्वी.
किनवट प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर आयोजित विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धा, जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये किनवट ची संस्था सौ लक्ष्मीबाई येशीमोड सेवाभावी संस्था कीनवट व सेल्फ डिफेन्स शटोकॉन कराटे असोसिएशन च्या कराटे पट्टूंनी घवघवीत यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत विध्यार्थानी प्रथम क्रमांक मिळवून आपली राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड सिद्ध केलेली आहे. या मधे विशाल निमलवाड, आर्यन मोहरे, वैष्णवी बेंद्रे, संचिता वाडगुरे, शिवानी पतंगे द्वितीय क्रमांकावर संस्कृती मेश्राम, अनुष्का राठोड, पल्लवी चव्हाण, तनिष्का चिलावार तर तृतीय क्रमांकावर आदर्श बोइंनवाड यांनी यश संपादन केले आहेत. या खेळाडुंना प्रशिक्षक संदिप येशीमोड यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रथम क्रमांकावर विजयी राज्यस्तर स्पर्धेत सहभागी खेळाडुंचे संस्था व पालकांच्या वतिने अभिनंदन करणाऱ्यात आले आहे.