धनुर्धरधनुर्धर

उस्मानाबादचा समरजीत ठरला देशातील सर्वोत्कृष्ट २ नंबरचा धनुर्धर.

राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा : कंपाउंड धनुर्धर समरजीतने पटकाविले २ सिल्वर मेडल

उस्मानाबाद प्रतिनिधी : भारतीय तिरंदाजी महासंघाच्या अधिपत्याखाली आंध्र प्रदेश धनुर्विद्या संघटनेच्या वतीने विजयवाडा येथे घेण्यात आलेल्या ९ वर्षाखालील वयोगटातील राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत आर्चरी असोसिएशन ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्टचा धनुर्धर समरजीत सुदर्शन शिंदे याने २ रौप्य पदक पटकाविले असून समरजीत ९ वर्षे वयोगटातील देशातील सर्वोत्कृष्ट २ नंबरचा कंपाउंड धनुर्धर ठरला आहे.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत समरजीत याने कम्पाऊंड राउंड प्रकारात वैयक्तिक एलिमिनेशन मध्ये रौप्य पदक व मिक्स टीम प्रकारात रौप्य पदक अशी २ रौप्य पदकांची कमई केली आहे. उस्मानाबाद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकत असलेला समरजीत शिंदे जिल्हा धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात आर्चरी कोच कैलास लांडगे कडे प्रशिक्षण घेत असुन त्याला जिल्हा संघटनेचे सचिव व मुख्य प्रशिक्षक प्रविण गडदे, सहसचिव व मुख्य प्रशिक्षक अभय वाघोलीकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

समरजीतने २ रौप्य पदके पटकाविल्याबद्दल जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, महाराष्ट्र अॅालिम्पीक संघटनेचे उपाध्यक्ष प्रा डॅा चंद्रजीत जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, जिल्हा धनुर्विधा संघटनेचे उपाध्यक्ष्य अतुल अजमेरा, कार्याध्यक्ष अविनाश गडदे, कोषाध्यक्ष गुलचंद व्यवहारे, सदस्य डॉ श्रीकांत कवठेकर, अनिल जमादार, सुधीर बंडगर, जिल्हा तांत्रिक समिती प्रमुख नितीन जामगे, स्पर्धा विभाग प्रमुख प्रताप राठोड, सचिव किरण शानमे, पोदार शाळेच्या प्राचार्या रम्या तुतीका, क्रीडा विभाग प्रमुख विवेक महाजन आदींसह राज्यातील धनुर्विद्या प्रेमींसह धनुर्धरांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!