चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

लातूर प्रतिनिधी : महिला सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सजगता वाढविणे या उद्देशाने चन्नबसवेश्वर फार्मसी कॉलेज (डिग्री), लातूर येथे १५ मे २०२५ ते २१ मे २०२५ या कालावधीत स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन, लातूर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. कार्यक्रमात कॉलेजमधील १०० हुन अधिक विद्यार्थिनीं सहभाग नोंदविला.

चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

या कार्यक्रमास तायक्वांदो असोसिएशन, लातूरचे सचिव मास्टर नेताजी जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत मास्टर धनश्री मदने व मास्टर जान्हवी मदने यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाच्या विविध तंत्रांची शारीरिक व मानसिक तयारीसह सखोल माहिती दिली. प्रशिक्षणात वास्तविक जीवनातील आपत्कालीन परिस्थितींना तोंड कसे द्यावे, शरीराच्या संरक्षण कसे करावे, आणि योग्य वेळी कोणती कृती करावी यावर भर देण्यात आला.

चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी दरम्यान विविध प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतला. स्वसंरक्षण हे केवळ एक कौशल्य नाही तर ती एक गरज आहे, या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रशिक्षण दिले गेले. मुलींनी विशेषतः यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि अनेकांनी प्रशिक्षणानंतर आपले अनुभव सांगताना सांगितले की, अशा उपक्रमांमुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे व गरज भासल्यास स्वतःचे रक्षण करण्याची तयारी त्यांनी शिकली आहे. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयेंद्र स्वामी, डॉ. ओमप्रकाश भुसनुरे, डॉ. अनंत देशपांडे, प्रा. महेश मानके, प्रा. प्रियंका तेलंग, प्रा. शितल हुमनाबादे, प्रा. वसीम काझी, प्रा. मधुरावारद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.
चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!