लातूरची शैक्षणिक पंढरी हादरली; शिकवणी वर्गांच्या परिसरातून हाकेच्या अंतरावर एमडी ड्रग्सची कारवाई.
एका महिलेसह चार जणांवर स्थानिक गुन्हे शाखेची छापेमारी; छत्रपती शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.
लातूर दिनांक 23 मे लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जाते याच शिक्षणाच्या पंढरीत शिकवणी वर्गांच्या परिसरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका महिलेच्या घरात छापेमारी करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 81 हजार 800 रुपयांचे (मेफेड्रोन) एमडी ड्रग्स सह 02 लाख 82 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर एका महिलेसह चार जणांवर छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिकवणी वर्गाच्या परिसरालगतच एका महिलेच्या घरी मेफेड्रोन एमडी ड्रग्स ची अवैद्य विक्री करत असल्याची गोपनीय माहितीवरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने छापेमारी करत ही कारवाई केली आहे. या घटनेने लातूरतील शैक्षणिक पंढरी हाधरून निघाली आहे.
मेफेड्रोन एमडी ड्रग्सची अवैध विक्री करण्यासाठी अनुप नवनाथ सोनवणे यांच्या पत्नीने स्वतःच्या घरामध्ये बाळगलेल्या अमली पदार्थाच्या दोन पिशव्यातील 16.36 ग्रॅम वजनाचा 81 हजार 800 रुपये किमतीचा अमली पदार्थ व गुन्ह्यात वापरलेले वेगवेगळ्या कंपनीचे चार मोबाईल, एमडी ड्रग्स वजन करण्यासाठी वापरण्यात आलेला वजन काटा असे एकूण 02 लाख 82 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर प्रकरणी एका महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास छत्रपती शिवाजीनगर पोलीस करीत आहेत
