भिषण_अपघात..

भिषण_अपघात..
नवमी दिवशीच झाला मोठा अपघात मारुती सुझुकी शिफ्ट MH24 AB0408 व उदगीर- चाकूर जाणारी बस क्रमांक MH14 BT1375 यांच्या भिषण अपघातात दोन जागीच ठार अनेक जण जखमी मृत्तांची संख्या वाढण्याची शक्यता..
लातूर नेता न्युज नेटवर्क
मुख्य संपादक श्री नेताजी जाधव
भिषण अपघात पाच जण जागीच ठार तर एक जखमी.
नवमी दिवशीच झाला मोठा अपघात मारुती सुझुकी शिफ्ट MH24 AB0408 व उदगीर- चाकूर जाणारी बस क्रमांक MH14 BT1375 यांच्या भिषण अपघातात पाच जागीच ठार अनेक जण जखमी मृत्तांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हि घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर जवळील परिसरात घडली आहे.
आज सकाळी उदगीर आगाराची एसटी बस उदगीरहून चाकूरकडे जात होती तर स्विफ्ट कार ही तुळजापूरहून दर्शन घेऊन उदगीरकडे येत होती. दरम्यान, लोहाऱ्याजवळ येताच गुळगे मिलच्या जवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. कोणाला काही समजायच्या आत कारचा चक्काचूर झाला. तर बस चालकाच्या बाजूचा बसचा भाग कापला केला. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन व शहर पोलीस ठाण्याचे तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.
मृतांची नावे
● अलोक तानाजी खेडकर, रा. संत कबीर नगर,उदगीर
● अमोल जीवनराव देवक्तते, रा. रावनकोळा,
● कोमल व्यंकट कोदरे, रा. डोरणाळी ता मुखेड,
● यशोमती जयवंत देशमुख, रा. यवतमाळ
●नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार, रा. बिदर रोड, उदगीर तर जखमींचे नावे प्रियांका गजानन बनसोडे, रा. एरोळ ह. मु. गोपाळ नगर, उदगीर असे आहेत.
लातूर नेता न्युज नेटवर्क
मुख्य संपादक श्री नेताजी जाधव
@LTN NEWS