लातूर वनविभागाकडुन वन्यजीव सप्ताहाचे आयोजन; ०७ ऑक्टोबर ला समारोप.

लातूर दि ०४ लातूर वनविभागामार्फत दि ०१ ते ०७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो या सप्ताह निमित्त वन्यजीवांसाठी लागणारे पोषक वातावरण, जैववैविध्यता, वन्यप्राणी व त्यांचा अधिवास अश्या विविध विषयांवर वनविभागाच्या वतिने लोकप्रबोधन केले जाते. त्याच अनुशंगाने आज मांजरेश्वर हनुमान विद्यालय विलासराव देशमुख वन उद्यान व जिल्हा परिषद शाळा साखरा येथे वन्यजीव प्रबोधन करण्यात आले.

यावेळी विभागीय वन अधिकारी सौ तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सचिन रामपूरे यांच्या मार्गदर्शनखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री निलेश बिराजदार वनपरिमंडल अधिकारी लातूर यांनी वन्यजीवाबाबत माहिती दिली अधिकारी लातूर श्री काळे श्री पवार श्री पाटील श्री येचवड, श्री महेश पवार वनरक्षक साखरा, श्री बालाजी पाटील वनरक्षक लातूर, श्री भालेराव, श्री बालाजी कांबळे, वन कर्मचारी व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकांसह मोठ्या संख्येवर विद्यार्थी उपस्थित होते.
