सार्वजनिक दांडिया महोत्सव समिती लातूर च्या वतीने जिल्हास्तरीय ९ दुर्गा रत्न पुरस्कार जाहीर.


लातूर दि ०४ ऑक्टोबर सामान्य स्त्रिया संकटांशी दोन हात करत आपले ध्येय गाठतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही प्रगतिपथावर आणतात त्यांचे समाजामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये उल्लेखनीय काम असतं त्यांचा संघर्ष असतानाही त्यांना समाजामध्ये महिलांना कायम दुय्यम स्थान दिलं जातं म्हणून कर्तुत्वान व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ९ दुर्गा यांना नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रात नावलौकिक कमावलेल्या ९ स्त्रियांचा गौरव सार्वजनिक दांडिया महोत्सव समिती लातूर च्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे
या निमित्ताने जिल्हास्तरीय दुर्गा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटणाऱ्या पुरस्कारार्थीमध्ये मा.प्रीती चंद्रशेखर भोसले युवा नेत्या उदगीर, मा. पुजा देवगुंडे आर्ट शिक्षिका स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूल लातूर, डॉ.प्रियंका वडजे भोसले पाटील वैद्यकीय क्षेत्र लातूर, मा.सुनिता इटकर उद्योजिका लातूर, मा. प्रीती कोळी जिल्हा अध्यक्ष धाडस संघटना लातूर, मा.शिखा अग्रवाल मेहंदी तथा नेल आर्टिस्ट लातूर, मा. योगिता ताई उमाकांत जाधव सामाजसेविका, मा.रेषा कांबळे संस्थाचालक ब्लॉसम किड्स इंग्लिश स्कूल लातूर, शीला घाटोळ लिनस क्लब अहमदपूर या जिल्हास्तरीय दुर्ग रत्न पुरस्कार च्या यंदा मानकरी ठरल्या आहेत.
या पुरस्काराचे वार शुक्रवार, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचा मा.आ.संभाजी पाटील निलंगेकर माजी पालकमंत्री, मा.आ. संजय बनसोडे माजी राज्यमंत्री ,मा.खा. सुनील गायकवाड माजी खासदार, मा.आ . रमेश आप्पा कराड आमदार विधानपरिषद, मा.आ. मेघनाताई बोर्डीकर आमदार जिंतूर, मा. प्रदीपबाबा पाटील खंडापुरकर संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, मा. संतोषजी सोमवंशी राज्य बाजार समिती संघ उपसभापती महाराष्ट्र, मा.शरद दादा कोळी संस्थापक अध्यक्ष धाडस संघटना , मा. विक्रांतजी गोजमगुंडे महापौर लातूर, मा. राहुल केंद्रे जिल्हा परिषद अध्यक्ष, मा अजित पाटील कव्हेकर लातूर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, डॉ. संजयजी जमदाडे जेष्ठ समाजसेवक लातूर, रुपेश पाडमुख सर मुख्य संपादक दैनिक समीक्षा, मा. रामेश्वरजी धुमाळ संपादक दैनिक समीक्षा लातूर या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सार्वजनिक दांडिया महोत्सव समिती चे संस्थापक अध्यक्ष श्रीजीत दादा ढगे, अध्यक्ष मानव कांबळे, गौरव धुलगुंडे उपाध्यक्ष, ऋषिकेश ढगे कार्याध्यक्ष , संतोष साखरे संयोजक यांनी दिलेल्या पत्रकात घोषित केले आहे.