कळंबकराना मिळणार आर्चरी ऑलीम्पिक क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण.
तालुका क्रीडा संकुल : धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रास सुरवात

उस्मानाबाद दि ०९ ऑक्टोबर आर्चरी असोसिएशन ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट आणि तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने “हर घर आर्चरी, हर गाव आर्चरी” संकल्पनेतून कळंब येथील तालुका क्रीडा संकुलावर रविवार पासून तालुका धनुर्विद्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रास सुरवात करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात धनुर्विद्या क्रीडा प्रकाराची भर पडणार असून आता कळंब तालुक्यातील खेळाडूंना धनुर्विद्या या ऑलीम्पिक क्रीडा प्रकाराचे आधुनिक प्रशिक्षण मिळण्यास सोईस्कर होणार आह
प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर भवर होते. यावेळी प्रा. डॉ. बाळकृष्ण भवर, जिल्हा आर्चरी संघटनेचे सचिव प्रविण गडदे, क्रीडा अधिकारी कैलास लटके, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ सचिन पवार, सचिव संजय देवडा, प्राचार्य देवानंद साखरे, प्राचार्य जगदीश गवळी, ज्येष्ठ क्रीडा संघटक लक्ष्मण मोहिते, तालुका क्रीडा संयोजक सुब्राव कांबळे, क्रीडा शिक्षक परमेश्वर मोरे, अनिल शिंदे, डॉ. गिरीश कुलकर्णी, गोविंद चौधरी, शिलवंत सर, आर्चरी कोच कैलास लांडगे आणि बालाजी चव्हाण आदींसह तालुक्यातील क्रीडा प्रेमी व खेळाडूंची प्रमुख उपस्तीथी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन परमेश्वर मोरे यांनी प्रस्तावना प्रविण गडदे यांनी तर आभार सुब्राव कांबळे यांनी मानले.
क्रीडा क्षेत्राचे पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कळंब तालुक्यात आता धनुर्विद्या या ऑलीम्पिक क्रीडा प्रकाराची भर पडली आहे. भविष्यात कळंब तालुक्यासारख्या ग्रामीण भागातून दर्जेदार व गुणवंत ऑलीम्पियन घडविण्याच्या दृष्टीने “हर घर आर्चरी, हर गाव आर्चरी” संकल्पनेतून भारतीय धनुर्विद्या महासंघाचे महासचिव प्रमोद चांदुरकर यांच्या जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्चरी असोसिएशन ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट व तालुका क्रीडा संकुल समितीच्या वतीने तालुक्यातील पहिले धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रास सुरवात करण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्रात जिल्हा धनुर्विध्या संघटनेच्या वतीने प्रशिक्षणार्थी खेळाडूंना आवश्यक क्रीडा साहित्य मोफत देण्यात येणार असल्याने तालुक्यातून अधिकाधिक खेळाडूंना प्रशिक्षण केंद्रात सहभाग घेता येणार आहे.
