भिषण अपघात..

लातूर दि ०९ ऑक्टोबर लातूर उमरगा हायवेवरील चलबुर्गा पाटी जवळ Breza कार क्रमांक TS07FL4994 व ट्रक क्रमांक MH18BH4585 यांच्यात आज सकाळी सात च्या सुमारास भिषण अपघात झाला आहे.
देवदर्शनाला गेलेल्या भक्तांवर काळाचा घाला
कार- ट्रकच्या भीषण अपघातात बाप – लेक जागीच ठार; 4 जण जखमी, एकाची प्रकृती अत्यवस्थ.
साई दर्शन करून निघाले होते हैदराबादला
तुळजापूरहून देवीचे दर्शन करून उदगीरला परतणाऱ्या भक्तांवर काळाने घाला घातला आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला ही घटना ताजी असताना आता शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन आंध्र प्रदेशातील हैदराबादला निघालेल्यावर काळाने घाला घातला आणि बापलेकीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले असून एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
अपघाताची ही घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या वाघोली पाटी येथे घडली आहे. हैदराबाद कडे निघालेल्या ब्रेझा कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ब्रेझा वाहनाचा चक्काचुर झाला आहे.
आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील व्यक्ती शिर्डी येथील देवदर्शनाहून परत जात असताना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वाघोली पाटीजवळ आले. त्याचवेळी समोरून एक ट्रक आला. या दोन्ही वाहनाची जोरदार धडक बदली आणि कोणाला काही समजायच्या आत एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या भीषण अपघातात सायकुमार डूबली आणि त्यांची कन्या तनविका सायकुमार डूबली हे दोघेही जागीच ठार झाले. तर पवित्रा सावरिया नविश, श्याम आणि शौर्य हे जखमी झाले आहेत. त्यांना लातूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पवित्रा सवरिया गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
दरम्यानया अपघाताची माहिती मिळताच किल्लारी पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून पुढील कारवाई केली जाईल.