
लातूर दि ०९ ऑक्टोबर मांजरा प्रकल्प धनेगाव ता. केज जि. बीड भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने नदीकाठच्या गावांना अति दक्षतेचा इशारा देणेबाबत.
कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग लातूर श्री रोहित जगताप यांच्या कार्यालया मार्फत काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पञकात दिनांक 09/10/2022 रोजीची सकाळी 6.00 वा. ची मांजरा प्रकल्पाची पाणी पातळी 641.33 मी. असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा 76.11 टक्के आहे. यानुसार प्रकल्पामध्ये येणारा येवा विचारात घेता प्रकल्प त्यांच्या निर्धारीत पातळीस केव्हाही भरण्याची शक्यता असून त्याअनुषंगाने नदीपात्रता विसर्ग सोडण्याची शक्यता आहे.
तरी आपणास विनंती की, मांजरा नदीकाठावरील शेतकरी किंवा वस्ती करून राहीलेले नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्वरीत सुरक्षीत स्थळी जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जेणेकरून जिवीत व वित्त हानी होणार नाही.