
लातूर दि १० ऑक्टोबर महादेव नगर येथील एका सांप्रदायिक महिला मंडळाने संत गोरोबा सोसायटी चेअरमन विकास कांबळे यांनी भेट घेऊन भजन कीर्तन व भजनासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी केली होती. त्यांची अडचण लक्षात घेऊन काँग्रेस कार्यकर्ते तथा संत गोरोबा सोसायटी चेअरमन श्री विकास कांबळे यांनी भजन कीर्तना साठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या कार्याचा भजनी मंडळातून कौतुक करत त्यांचा सन्मान करून आभारही व्यक्त केले आहेत.
यावेळी सौ केशर कांबळे, दाताल सुशीलाबाई, सविता जगताप, मिना जगताप, वसुदा घोडके, निर्मला कासले, नवनाथ कासले, विजय जगताप, सुभान रकते, कांता रकते याच्यासह सर्व भजनी मंडळाच्या महिला पुरुष उपस्थित होते.