
विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल.
लातूर दि १२ ऑक्टोबर लातूर शहरातील कातपूर रोडवरील कन्हैयानगर येथील व्यापारी आकाश राजकमल अग्रवाल यांच्या घरी बुधवारी 12 ऑक्टोम्बर रोजी पडलेल्या दरोड्यात दरोडेखोरांनी 2436 5 ग्रॅम सोन्याचे 73 लाख 9500 रुपये किमतीचे दागिने व 2 कोटी 25 लाख रूपयांची रोकड असा एकूण 2 कोटी 98 लाख 9500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती आज सायंकाळी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. जितेंद्र जगदाळे यांनी दिली आहे.
ज्यांच्या घरावर दरोडा पडला त्या आकाश अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही पोलीस उपअधीक्षक जगदाळे यांनी सांगितले आहे.
काळे जॅकेट आणि तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या पाच दरोडेखोरांनी रात्री अडीच ते साडे तीन वाजण्याच्या दरम्यान अग्रवाल कुटुंब झोपेत असताना घरात प्रवेश करून पिस्तुल, चाकू, कोयत्याचा धाक दाखवून कपाटातील 73 लाख 9500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व सव्वा दोन कोटींची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली.असे व्यापारी आकाश अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आकाश अग्रवाल यांचे गोयल इंटरप्रायजेस हे होलसेल हार्डवेअरचे गंजगोलाईत दुकान आहे.
