
लातूर दि १३ ऑक्टोबर लातूर येथील सामाजिक, राजकीय, उद्योग, व्यवसायातील प्रतिष्ठित, लातूर महानगर पालिकेचे माजी नगरसेवक नरेंद्र देवीचंद अग्रवाल (वय 62 ) यांचे 13 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर लातूर येथील मारवाडी स्मशानभूमीत शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते लातूर येथील जीवन विकास प्रतिष्ठानमध्ये सचिव पदावर कार्यरत होते. त्यांनी विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक, व्यापार, क्षेत्रात मोठे नाव मिळविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.