main graphics
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान.

लातूर दि १६ ऑक्टोबर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र चे अधिवेशन येत्या २९ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर येथे होणार असून या अधिवेशनाबाबत पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना लातूर जिल्हा कार्यकारिणीची आज १६ ऑक्टोम्बर रोजी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीत संघटनेच्या महाबळेश्वर येथे होणाऱ्या पहिल्या अधिवेशनाला लातूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त डिजिटल संपादक पत्रकार सदस्यांनी सहभागी होण्याबाबत आवाहन करून जेवरीकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना मराठवाडा कार्याध्यक्ष संजय जेवरीकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष के वाय पटवेकर, जिल्हा उपाध्यक्ष हमीदभाई शेख, जिल्हा सचिव जेष्ठ पत्रकार गोपाळ कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव कांबळे, नितीन भाले, नेताजी जाधव, बालाजी उबाळे, बी.जी. शेख, जावेद मुजावर, सलीमभाई पठाण, जिल्हा महिला प्रतिनिधी अहिल्या कसपटे, दत्ता परळकर यांच्यासह बहुतांश सदस्य संपादक पत्रकारांची उपस्थिती होती.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!