लातूर दि १९ ऑक्टोबर शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी व ऑनलाईन फाॅर्म भरण्यासाठीच्या कार्यशाळेचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लातूर जिल्ह्यातून व शहरातून क्रीडा शिक्षकांची उपस्थिती होती. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच शालेय स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धा पहिल्या टप्पात ४९ अनुदानित खेळाच्या होणार आहेत. या क्रीडा स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील खेळाडुंनी सहभाग नोंदविण्यासाठी शाळेनी सहभागी व्हावे असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांनी सांगितले. तत्पूर्वी या बैठकीला उपस्थित क्रीडा उपसंचालक श्री सुधीर मोरे, माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री नागेश मापारे, मनपा शिक्षण अधिकारी श्री साहेबराव जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांचा सत्कार करुन बैठकीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी क्रीडा अधिकारी मदन गायकवाड, कृष्णा केंद्रे, सुरेंद्र कराड, चंद्रकांत लोदगेकर, जयराज मुंडे व जिल्ह्यातील विविध शाळांतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
