शिवसेनेचे निलंगा तालुक्यातील भूकंपग्रस्तासोबत उपोषण सुरु.
लातूर दि १८ ऑक्टोबर हासोरीत येत असलेला तो गुढ आवाज भूकंपाचा नव्हे म्हणून नागरिकांनी खोटा दिलासा देत प्रशासनाचा प्रयत्न झाला. पण तो दिल्ली च्या भूकंप मापकाने खोटा ठरवला. आणि आज दररोज निलंगा तालुक्यातील बडूर, औंढा, नेलवाड, कासार शिरसी, रामलिंग मुदगड, हलसी, हत्तरगा, डोंगरगाव, अंबुलगा, हंद्राळ, हनुमंतवाडी, हाडोळी, आनंदवाडी, मदनसुरी, येलमवाडी, लिंबाळा, सयाखान चिंचोली, भंगार चिंचोली, बोळेगाव चांदोरी, चांदोरी वाडी, भूत मूगळी, हरी जवळगा, मुदगड, रामलिंग, शाबितवाडी, ऊस्तूरी, शिराढोण, बालकुंदा, पिरू पटेलवाडी, सरदारवाडी, बालकुंदा, कलमूगळी, वाकसा आणि शेजारील परिसरात भुकंपाचे हादरे बसत आहेत.

या भागात एकही भूकंप रोधक घर नाही. वरुन पाऊस सुरु नागरिक भयभीत अवस्थेत आहेत. त्यांना तात्पुरता निवारा नाही. या भयभीत नागरिकांना दिलासा आणि यांची अडचण शासनाचा लक्षात येत नाही ते का येत नसावी याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे लातूर जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने हे काल दि १७ ऑक्टोबर पासुन या भागत उपोषणाला बसले आहेत. येथील नागरिकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करुन द्यावा प्रशासनाने नागरिकांना दिलासा देऊन त्यांचा सोबत असल्याचा विश्वास देणे अपेक्षित आहे. पण जिल्हाबरोबरच लातूर मनपाचा अतिरिक्त भार सांभाळणारे व्यस्त जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील का? याकडे लातूर करांचे लक्ष लागले आहे.

याच महिन्यादरम्यान १९९३ साली प्रलयकारी भुकंप आला आणि हजारे घरे उद्वस्त झाली. अनेक बेघर झाली. अनेक अनाथ पोरके झाले. मि ही या भुकंपात अडकले कसा तरी बचावलो गेलो त्या वेदना आजही काहीकेल्या जात नाही. आणि त्या पुन्हा आज रक्तरंजित होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का संतप्त सवालही या वेळी श्री शिवाजीराव माने यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत या भागातील नागरीकांची तात्पुरती सोय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी यावेळी लातूर नेता न्युज शी बोलताना सांगितले.