main graphics
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा. दिवाळीच्या आपणासर्वांना हार्दिक शुभेच्छ.

लातूर दि १८ ऑक्टोबर बसवंतपुर व भामरी परिसरात नागरी समस्या सुटत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रदेशाध्यक्ष श्री संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली भामरी चौकात रास्ता रोको करण्यात आला त्याचा परिणाम असा झाला कि मनसे पदाधिकारी संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटायला गेल्यावर तासनतास वेटिंग ला उभा करणारे अभियंता यावेळी धावतपळत आले आणि निवेदन स्वीकारत तात्काळ रखडलेल्या कामांना सुरुवात करत लेखी आश्वासन दिले.

या भागात रस्ता बरोबर नाही तो इतका खराब आहे कि पाऊस पडल्यानंतर कुठे आहे हे शोधावा लागतो. आजही या भागात नागरिक पाणी विकत घेतात. अंगणवाडी नाही. प्राथमिक आरोग्य सुविधा नाहीत. अगदी शहरालगत या भागातील अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी भागवत शिंदे व अंकुश शिंदे यांनी शासकीय कार्यालयात अनेक वेळेस जाऊन आले पण प्रशासन याकडे गांभीर्यपूर्वक पाहत नसल्यामुळे आज प्रदेशाध्यक्ष श्री संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आले आणि त्याला तात्काळ गांभीर्यपूर्वक घेत प्रशासनाने कार्यवाही केली.

यावेळी मनसेचे मनोज अभंगे, किरण चव्हाण, प्रिती भगत, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!