रितेश जेनेलिया चा त्या प्रकल्पासाठी भूखंड वाटप नियमानुसार – केसरे

    लातूर दि २० ऑक्टोबर लातूर अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत देश ॲग्रो या कृषी प्रक्रिया आधारित उद्योगासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडाबाबत ॲड. प्रदीप मोरे आणि गुरुनाथ मगे यांनी प्रसिध्दीपत्राच्याद्वारे घेतलेले आक्षेप वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचा खुलासा देश ॲग्रोचे आस्थापना व्यवस्थापक दिनेश केसरे यांनी केला आहे. 

    लातूर परिसरातील शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि येथे कृषी आधारित उद्योगाची वाढ व्हावी या उद्देशाने देश ॲग्रोची स्थापना करण्यात आली असून सोयाबीन प्रक्रिया आणि सोयाबीन आधारित विशेष उत्पादने या उद्योगामध्ये घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने अतिरिक्त लातूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड या उद्योग घटकास रितसर आणि नियमानुसार लिजवर दिलेला आहे. 

    देश ॲग्रोचे प्रवर्तक रितेश आणि जिनिलिया देशमुख हे कायद्याचे आदर राखणारे आहेत. तसेच सामाजिक भान बाळगणारे असल्याची त्यांची ओळख आहे. या उद्योग घटकासाठी वित्तीय संस्थांनीही नियमानुसार कर्ज वितरित केले असल्याने संबंधितांचे आक्षेप वस्तुस्थितीला धरुन नाहीत. ॲड. प्रदीप मोरे आणि गुरुनाथ मगे यांनी नव्याने उभारण्यात येणाऱ्या या कृषी आधारित उद्योगासाठी विरोधी भूमिका घेऊ नये अशी आमची त्यांना विनंती आहे असेही केसरे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

main graphics
Best wishes and regards ahead of Diwali to you and your family.

You cannot copy content of this page

error: Content is protected !!