
पुणे दि १६ ऑक्टोबर शासनाच्या अनेक पुरस्कारांचे मानकरी; सरिसृत तज्ञ श्री अनिलकुमार खैरे यांचे आज दि १६ ऑक्टोबर रोजी पुणे येथे निधन झाले आहे. ते पुणे येथील काञज सर्प उद्यानाचे संचालक होते. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासात अतिशय कुशल आणि अभ्यासु होते. अनिल कुमार खैरे यांचे वय ६३ होते तर ते सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे यांचे ते लहान बंधु असुन त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा हे आहेत. त्यांच्या जाण्याने सर्प जगतातील अभ्यासक, सर्पमित्र, प्राणीमिञांतून हळहळ व्यक्त करत आहेत.