
लातूर दि १६ ऑक्टोबर लातूर शहरातील वॉर्ड क्रमांक 3 मधील महादेव नगर , प्रबुद्ध नगर, करीम नगर भागातील नागरिकांनी 2012 मद्य स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदानाचा अधिकार बजावला असून विधानसभा,लोकसभेत मतदान करतात पण 2017 पासून येथील नागरिकांना स्थानिक स्वराज्य महानगरपालिका निवडणूकित मतदानाच्या यादीतून नावे वगळण्यात आले आहे स्थानिक नागरिकांना महाराणा ग्रामपंचायत मध्य सुद्धा मतदानाचा अधिकारापासून वंचित ठेवल्याने स्थानिक विकास होत नाही या परिसरातील नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा या मागणीचे निवेदन स्थानिक नागरिकांच्या वतीने लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीचे संस्थापक दीपक गंगणे, सुरेश संगापुडे, योगेश डोंगरे, सदाशिव चाफेकर यांनी लातूर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बी पी पृथविराज यांना मनपा सी झोन अधिकारी कार्यालयात भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले या वेळी महानगरपालिका उपयुक्त मयुरी शिधिकर,क्षत्रयधिकारी समाधान सूर्यवंशी,अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.