
लातूर दि ०४ नोव्हेंबर महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज,वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेल्या योजनांना पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. प्रस्तावित असलेल्या योजना व प्रकल्पांना राज्य व केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवून देऊन जिल्ह्याच्या विकासाची गती कायम ठेवावी अशी मागणी प्रतिनीधी म्हणुन माजी मंञी आमदार श्री अमित देशमुख यांनी केली.
1️⃣ लातूर जिल्हा शासकीय रुग्णालय उभारण्याकरिता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असलेली कृषी महाविद्यालयाची जागा त्वरित हस्तांतरित करावी .
2️⃣ लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय,प्रशासकीय इमारत व नियोजन भवन बांधकामाच्या प्रस्तावास त्वरित मंजुरी द्यावी.
3️⃣ महाराष्ट्रातील ९ ते १५ या वयोगटातील मुली व १६ ते ४५ या वयोगटातील महिला यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सव्र्हावॅक ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एच.पी.व्ही.) लस मोफत उपलब्ध करुन द्यावी.
4️⃣ लातूर शहरातील जुनी शासकीय गोदामे महानगरपालिकेच्या जागेमध्ये हस्तांतरित करुन जुन्या धान्य गोदामाची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी.
5️⃣ लातूर शहराबाहेरुन जाणारा नवीन बाह्यवळण रस्त्याच्या (६१.८० कि.मी.) बांधकामास आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्या निधीमधून मंजुरी द्यावी.
6️⃣ लातूर शहरातील पटेल चौक येथे विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाच्या वतीने उभारावयाच्या
स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र आणि बालरोगशास्त्र विभाग तसेच १८९ खाटांचे नवीन रुग्णालय ईमारत बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी.
7️⃣मौजे साई ता.जि.लातूर येथील लातूर महानगरपालिका मालकीच्या जागेवर पर्यटन स्थळाचा नियोजनबध्द विकास करण्यासाठीच्या प्रस्तावास निधी उपलब्ध करुन द्यावा.
8️⃣ लातूर शहरातील भूमिगत केबल योजनेच्या कामाची केंद्र शासनाकडे शिफारस करून निधी उपलब्ध करून द्यावा.
9️⃣लातूर येथे युनानी तसेच आयुर्वेदिक महाविद्यालय उभारणी बाबतचे प्रस्ताव दाखल आहे त्यास मंजुरी मिळवून द्यावी.
🔟 लातूर – बार्शी – कुर्डुवाडी – टेंभुर्णी या महामार्गाच्या कामाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळणेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाठपुरावा करावा. त्याचबरोबर ग्रामीण भागातील स्मशानभूमीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जमीन खरेदी करण्यासंदर्भात धोरणाची आखणी करावी आदी मागण्या यावेळी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन पालकमंञी मा श्री गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आले आहे.
