भारदस्त उंची सोबतच उच्च विचारांचा मनमिळाऊ मुख्याध्यापक सेवानिवृत्त..
विद्यार्थी भाऊक; शिक्षक कोमेजलेले आणि सेवक निशब्द

लातूर दि ०१ नोव्हेंबर शिक्षणाचा पॅटर्न असलेल्या लातूर येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री केशवराज विद्यालयाचे भारदस्त उंची सोबतच उच्च विचारांचा मनमिळाऊ मुख्याध्यापक श्री सुनिल लक्ष्मीकांत वसमतकर हे काल दि ३१ ऑक्टोबर रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे शालेय विद्यार्थी भाऊक झालेले दिसत होते. यांचा सहवास कायम सोबत असावा असे वाटणारे शिक्षकांचे चेहरेही कोमेजलेली दिसत होती तर शाळेतील सेवकही निशब्द झाली होती.
श्री वसमतकर हे सन १९९० साली भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या माजलगाव येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयातून शिक्षक या पदावर सेवेत रुजू झाले आणि सन २०२० साली ते पोखरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयात मुख्याध्यापक पदावर रुजू झाले ते पुढे लातूर येथील श्री केशवराज विद्यालयातून काल दि ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाले. ते अत्यंत प्रेमळ, शिस्तप्रिय, हुशार, कुशल व्यवस्थापक आणि मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्याशी प्रत्येकजण अगदी सहज जुळला जायचा त्यामुळे त्यांचा काल झालेल्या सेवानिवृत्तमुळे सर्वजण त्यांच्या भोवताली गराडा घालून होते. ते जरी सेवानिवृत्त झाले असले तरी ते नेहमी त्यांच्या स्वभावामुळे आठवणीत राहतील असाच भाव श्री केशवराज विद्यालयात पहायला मिळत होता.