#कुतुब_मिनार ही विटांनी बांधलेली जगातील सर्वात उंच इमारत आहे. हा मिनार भारताच्या दक्षिण दिल्ली शहरातील मेहरोली भागात आहे. हा मिनार पाहायला परदेशातून लोक येत असतात. ही वास्तू युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे.
१३ व्या शतकात कुतुब मिनाराच्या बांधकामास सुरूवात झाली. हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे. कुतुब मिनार लाल दगडानी बांधलेला आहे. कुतुबुद्दीन ऐबकाच्या नावावरून त्याला कुतुब मिनार असे संबोधले जाते. कुतुबुद्दीनने आपल्या हयातीच्या काळात मिनारचे बांधकाम केले. पण तो कुतुब मिनारचा फक्त पाया पुर्ण करू शकला. त्याचा ऊत्तराधिकारी ईल्तुतमिश याने मिनारचे पुढील बांधकाम पूर्ण केले. एकूण १०० एकर जागेत मिनार व मिनारचा परिसर आहे. मिनारची उंची २३७.८ फूट इतकी आहे. मिनारचा घेर जमिनीलगत १४.३२ मीटर इतका आहे. सर्वात शेवटचा मजला फिरोझ शाह तुघलक ह्याने ईसवी सन १३८६ मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनार वर सर्व बाजुंनी कुराणातिल वचने आणि अनेक अप्रतिम इस्लामिक शिल्प कोरलेली आहेत.
कुतुब मिनारच्या निर्मितीचा इतिहासही तसा फार रोमांचक असा आहे. दिल्लीवर पृथ्वीराज चव्हाण या हिंदू राजाचे राज्य होते. तो अकरा-बाराव्या शतकाचा काळ होता. त्यानंतर मोहंमद घोरीने स्वारी करून दिल्ली आपल्या ताब्यात घेतली. अवघ्या काही वर्षातच कुतुबुद्दीन ऐबकाने मोहंमद घोरीला पराभूत करून दिल्लीवर आपले साम्राज्य स्थापित केले. कुतुबुद्दीनाने घोरीवर मिळविलेल्या शानदार विजयाचे प्रतिक म्हणून कुतुब मिनार बांधावयास घेतले.
