सखाराम पाटील शाळेचा विभागीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत डंका.
मानसी राजेंद्र ढवळे थोपटणार उदगीर येथे राज्य कुस्ती स्पर्धेत दंड.
लातूर दि 21 सप्टेंबर औसा तालुक्यातील भुसणी शिवणी येथे विर हणुमान व्यायाम शाळा व क्रिडा मंडळाने लातूर विभागीय क्रीडा कार्यालयाच्या विभागीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सखाराम पाटील प्राथमिक शाळेच्या कुमारी मानसी राजेंद्र ढवळे हिने सब जुनिअर वयोगटातील ३६ किलो वजनी गटात फ्री स्टाईल प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला असुन ती उदगीर येथे दि 23 व 24 सप्टेंबर रोजी संपन्न होत असलेल्या राज्य स्पर्धेत लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कठिण परिस्थितीशी दोन हात करत या विद्यार्थिनीने इयत्ता सातवीत आपले शालेय शिक्षण घेत कुस्तीचा सराव चालु केला आहे तिने हे यश पहिल्या टप्प्यातच जिल्हा व विभागीय स्पर्धेत संपादन केले आहे. या यशाबद्दल प्रशालेला आकाश ठेंगणे झाले असुन मोठ्या आनंदाचे वातावरण यावेळी पहायला मिळाले तिच्या या यशाचे सखाराम पाटील प्राथमिक शाळेच्या वतिने संस्थेचे सचिव श्री जाधव व्ही.एस. यांनी सत्कार करुन राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाघमोडे व्ही व्ही श्री तळेगावे व्ही पी, श्री जाधव एन डी, श्री भंडारे जि व्ही, श्री कल्लेकर, श्रीमती थोरात के एम, श्रीमती शिंदे एस यु यांच्यासमवेत प्रशालेचे सर्व विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. यावेळी विध्यार्थ्यांना श्री वाघमोडे यांनी खेळाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तळेगावे यांनी तर आभार श्री जाधव एन डी यांनी मानले.